Sunday, October 2, 2016

आज परत एकदा सैराट ........ 

आज परत एकदा सैराट ........ 

         आज रविवार असल्यामुळे जरा उशिरा उठलो, सर्व आटोपून एका कामासाठी घराबाहेर  पडलो , तेवढ्यात रस्त्यावरच्या एका घरा जवळ नुकत्याच खूप गाजणाऱ्या " सैराट " चं  गाणं कानावर पडलं , पुढे जाऊन बघितलं तर ९ ते १० वर्ष वयोगटातील ५-६  मुलं मोठ्या जोशाने अन एक मुखानें  बोलत होती " समद्या  गावाला झालिया माझ्या लगनाची घाई,कधी होशील तू माझ्या लेकराची आई " ,त्यांचा तो जोश आणि उत्साह बघून मला नवलच  वाटले. काय  समजत असेल मुलांना ह्या गाण्याचा अर्थ? पण तरी ते पूर्ण ताल आणि सुरामध्ये गात होते. 
      आपल्या मराठी मध्ये व काही प्रमाणात हिंदी मध्ये पण गडद विचाराचा काही दाखवला कि त्याला लोक उचलून घेतात , खूप चांगला आहे , विचारात प्रगल्भता आली पाहिजे त्यात वाद नाहीच . पण सैराट ला प्रसिद्धी  भेटून आपल्याला काय मिळाले ? प्रत्येक लहान मुला पर्यंत सैराट विषयीची नको नको ती गोष्ट पोहचली आणि काही चॅनेल ते अजून पण पोहचवण्याचे सत्कर्म करत आहेत...सैराट मध्ये आर्ची लग्नाच्या वयाची दाखवली असली तरी प्रत्येकाला माहित आहे ती इयत्ता ९ वी  मध्ये आहे ,सैराट चे गाणीं  म्हणणारे ५ वी , ६वी ची  मुलं गुढग्याला बाशिंग बांधतायत मग आता ह्याचा परिणाम आपल्या शाळेतल्या मुलींवर झाल्याशिवाय राहील असा वाटत नाही. 
       बरं नागराज ला सामाजिक सुधारणां वर प्रकाश टाकायचा होता असा माणून थोडा विचार करू कि नक्की काय सुधारणा झाल्या व होतील सैराट बघुन ? अन तसा दाखवायचाच होत तर ९ वी  मधली आर्ची  भेटली हे सर्व दाखवायला? म्हणे तिची ऑडिशन घेतली बुवाने !!! म्हणजे अक्ख्या महाराष्ट्रात त्याला हि रिंकूच भेटली !!!!  त्या १३-१४ वर्ष्याच्या मुलीला, जीला काय चांगले काय वाईट हे अजून समजायचे आहे तिला ह्या झगमगाट ढकलले ह्या पठयानें. ज्या झगमगाटाने किती लोकांचा बळी  घेतलाय हे आपल्याला माहीत आहेच कि !!!! ह्या इवल्याश्या जीवाला ह्या झगमटात आणून तिची पुढच्या सर्व आयुष्यात तिला हाच फेम भेटेल ह्याची जबाबदारी घेतील का हे समाज सुधारक ? कि सोडून देतील तिला वाऱ्यावर त्या वर वर सुंदर वाटणाय्रा भकास दुनियेत, जिया खान असो वा आनंदी असो व इतर, आपण त्यांची परिस्थिती बघितलीच ना? फेम असताना डोक्यावर घेऊन नाचणारे लोक नंतर विसरून जातात आणि ह्या फेम ची सवय लागलेली हि तरुण वयाचे कलाकार मंडळी नंतर लोकांचे लक्ष कमी झाले कि दडपणाखाली येतात  अन नको ते करतात !!! 
       फिल्म चा विषय खूप चांगला होता, आपल्या समाजामध्ये असणाऱ्या घाणेरड्या विचार प्रवृत्तीवर प्रकाशा आणणारा होता ,पण ह्या वाईट प्रवृत्तीं वर प्रकाश पडण्याऐवजी,  कोणत्या गोष्टीवर पडला वा पैसे वसूल करण्यासाठी मुद्दाम आणला गेला......  ९ वी  शिकणाऱ्या आर्चीवर ? तिच्या  किंवा इतर लोकांच्या अशुद्ध मराठीवर ? आर्ची  आणी  परश्याच्या वैयक्तिक जीवनावर ? घरच्यांचा  विरोध असणाऱ्या प्रेम संबंधांवर ? 
     आता मुद्द्याचं बोलायचं झालं तर समाज सुधारणा करायच्या असतील तर त्याला बरेच मार्ग आहेत, काही लोक स्वतःला  समाज सुधारक दाखवून स्वतःच्या सुधारणा घडवून आणतात हे तर दिसतेच, बस झालं आता सैराट चा गोंधळ,नागराजजी आणि झी मराठी ला एक विनंती आहे कि समाजाला सुधारायचा राहू दे फक्त एक आश्वासन आम्हाला द्या कि ह्या इतक्या लहान वयातील मंडळींना आणून इतके पैसे कमावले ना ? मग आता त्यांची जबाबदारी पण घ्या , सैराट ची 'झिंग ' कमी झाली कि ह्यांचे भविष्य वाऱ्यावर नका सोडू , इतका केला तरी खूप झाले...   आणि बालकामगारांना विरोध असणाऱ्या आपल्या कायद्याने   आणि so called सेन्सॉर  बोर्ड ने पण लहान वयाच्या मुला मुलीं ना  काय भूमिका  द्यायच्या ह्यावर लक्ष द्यायला हवे असे वाटते ... नाही तर आज पर्यंत " रोगापेक्षा इलाज भयंकर " ह्या पद्धतीने जसे चालते तसेच चालत राहील...




No comments:

Post a Comment