Thursday, December 7, 2017

प्रेम म्हणजे....

प्रेम.. खर तर अती महत्वाचा शब्द.. अर्थ समजला तर जपून वापरावा असा... नाहीतर सर्रास वापरतात येणारा.. एखाद्यावर प्रेम करनं किव्हा देणं हे त्या त्या वयानुसार घडत असतं.. पण कोणतीही गोष्ट द्यायची म्हणजे ती पहिली आपल्याकडे असावी लागते.. तसंच प्रेमाचं सुद्धा असलं पाहिजे... आणि जर एखाद्यावर प्रेम करायचं असेल तर ते आपल्याकडे असायला हवं..
नुकताच एका मित्राशी लग्न ह्या विषयावर गप्पा झाल्या... "आता पर्यन्त 12 मुली बघितल्या पण एक पण पसंद नाही पडली रे" जरा निराश होऊन तो बोलत होता.. एकूण त्याच्या अपेक्षा असणारी मुलगी त्याला आजपर्यन्त मिळाली नाही.तो अजुन थोडया फार मुली बघेलच. म्हणजे इतक्या मुली बघून नंतर त्यातली एक तो सलेक्ट करणार.. आणि लग्न करणार.. त्यानन्तर तिच्या वर खुप प्रेम आहे अस दाखऊंन.. आणि "made for each other..love you"  अशी tagline टाकून fb.. insta वर फ़ोटो upload करणार... ह्यात प्रेम आलेच कुठे ?? मुलींची पण अवस्था तीच.. मुलगा खुप शिकलेला हवा, मुलाकडे स्वतःच घर हवं, कायम नोकरी हवी किव्हा settle busnisess हवा त्यानन्तर दिसायला देखना पण हवा.. आता एवढा सर्व असेल तर त्या नंतर समजून घेणारा हवा.. जर इतकं सर्व त्याच्याकडे 27-28 व्या वर्षापर्यन्त असेल तर अश्या मुलींनी जरा आपल्या वडिलांना एक प्रश्न विचारावा की त्यांना हे सर्व कितव्या वर्षी जमले?? एकून आपल्या आपल्या सोईच्या सर्व गोष्टी बघायच्या आणि नंतर जमले तर प्रेम करायचं.. त्यात पण काही मागे पुढे झाला तर separate व्हायचे.. प्रेम हे जर द्यायचे असेल तर समोरच्या कड़े काय आहे हे बघण्यापेक्षा काय नाही हे बघितले पाहिजे....म्हणजे एकाकडे जर काही कमी असेल तर दूसरा ते भरून काढण्याचे आयुष्यभर प्रयन्त करणे यालाच प्रेम म्हणतात...
प्रेम म्हणजे समजली तर भावना.. केली तर मस्करी.. मांडला तर खेळ.. ठेवला तर विश्वास.. आणि निभावलं तर जीवन असते.. शेवटी काय..आपल्या आयुष्यात कोण येणार हे वेळ ठरवते.. आपल्या आयुष्यात कोण यायला पाहिजे हे मन ठरवते पण आपल्या आयुष्यात कोण टिकून राहणार हे मात्र आपला स्वभावच ठरवतो...