Thursday, December 7, 2017

प्रेम म्हणजे....

प्रेम.. खर तर अती महत्वाचा शब्द.. अर्थ समजला तर जपून वापरावा असा... नाहीतर सर्रास वापरतात येणारा.. एखाद्यावर प्रेम करनं किव्हा देणं हे त्या त्या वयानुसार घडत असतं.. पण कोणतीही गोष्ट द्यायची म्हणजे ती पहिली आपल्याकडे असावी लागते.. तसंच प्रेमाचं सुद्धा असलं पाहिजे... आणि जर एखाद्यावर प्रेम करायचं असेल तर ते आपल्याकडे असायला हवं..
नुकताच एका मित्राशी लग्न ह्या विषयावर गप्पा झाल्या... "आता पर्यन्त 12 मुली बघितल्या पण एक पण पसंद नाही पडली रे" जरा निराश होऊन तो बोलत होता.. एकूण त्याच्या अपेक्षा असणारी मुलगी त्याला आजपर्यन्त मिळाली नाही.तो अजुन थोडया फार मुली बघेलच. म्हणजे इतक्या मुली बघून नंतर त्यातली एक तो सलेक्ट करणार.. आणि लग्न करणार.. त्यानन्तर तिच्या वर खुप प्रेम आहे अस दाखऊंन.. आणि "made for each other..love you"  अशी tagline टाकून fb.. insta वर फ़ोटो upload करणार... ह्यात प्रेम आलेच कुठे ?? मुलींची पण अवस्था तीच.. मुलगा खुप शिकलेला हवा, मुलाकडे स्वतःच घर हवं, कायम नोकरी हवी किव्हा settle busnisess हवा त्यानन्तर दिसायला देखना पण हवा.. आता एवढा सर्व असेल तर त्या नंतर समजून घेणारा हवा.. जर इतकं सर्व त्याच्याकडे 27-28 व्या वर्षापर्यन्त असेल तर अश्या मुलींनी जरा आपल्या वडिलांना एक प्रश्न विचारावा की त्यांना हे सर्व कितव्या वर्षी जमले?? एकून आपल्या आपल्या सोईच्या सर्व गोष्टी बघायच्या आणि नंतर जमले तर प्रेम करायचं.. त्यात पण काही मागे पुढे झाला तर separate व्हायचे.. प्रेम हे जर द्यायचे असेल तर समोरच्या कड़े काय आहे हे बघण्यापेक्षा काय नाही हे बघितले पाहिजे....म्हणजे एकाकडे जर काही कमी असेल तर दूसरा ते भरून काढण्याचे आयुष्यभर प्रयन्त करणे यालाच प्रेम म्हणतात...
प्रेम म्हणजे समजली तर भावना.. केली तर मस्करी.. मांडला तर खेळ.. ठेवला तर विश्वास.. आणि निभावलं तर जीवन असते.. शेवटी काय..आपल्या आयुष्यात कोण येणार हे वेळ ठरवते.. आपल्या आयुष्यात कोण यायला पाहिजे हे मन ठरवते पण आपल्या आयुष्यात कोण टिकून राहणार हे मात्र आपला स्वभावच ठरवतो...

Thursday, November 30, 2017

यशस्वी जीवन म्हणजे नक्की काय?

शिस्त हा जीवनामधला अविभाज्य घटक आहे. एक सेकंदने लोकल जाणाऱ्या किव्हा भेटणाऱ्या लोकांना त्याचे महत्व आज चांगलेच समजत असेल!

आज जरी आपल्याला हे वाटत असल तरी लहान असताना आपल्याला शिस्त नको वाटायची!" छड़ी लागे छम छम.. विद्या येई घम घम" अशी ती वेळ होती !!🤣

काल अचानक त्यांना समोर बघून पाय थांबलेच. मी कदाचित तीन- साडेतीन वर्षाचा असताना म्हणजेच शाळेत जायला सुरु केल्यापासून त्यांची ओळख झाली असेल.
शिपाई असल्या तरी मुख्यध्यापकां पेक्षा जास्त दरारा असायचा त्यांचा!! चोवीस- पंचवीस वर्षांनंतर पण अजुन तशाच !! तो ताठरपना, तोच पेहराव, तोच कड़क आणि धड़की भरावणारा आवाज़ !!! अर्थात त्यांनी नावाने ओळखला नसेल मला पण मी थांबलो आणि त्यांची विचारपुस केली. " कशा आहात? , कसा चालू आहे सर्व?" आणि अजुन काही औपचारिक गप्पा झाल्या.
आमच्या शिशुमंदीरच्या "गुरव बाई"!!
  शाळेत असताना आम्ही ज्यांना सर्वात जास्त घाबरत होतो!!! त्यांच्या नावाची धमकी आमच्या सर्व शिक्षकांपासून घरी आई पण द्यायची! साधारणतः लहान मूल  3 ते 8 वर्षाच असताना त्यांच्या अंगात मूल्यशिक्षण रुजवायच काम हे चांगल्या प्रकारे होत असत. त्याच वेळेत गुरव बाईं सारखे शिस्त प्रेमी लोक मिळणे म्हणजे स्वतःला भाग्यवान मानणे अतिशयोक्ति होणार नाही !डब्यात आवडती भाजी असो नसो पण बाईंच्या भीतीने मधल्यासुट्टीत सर्व डबा संपवायला लागायचा. आपल्या जीवनात नआवडत्या  गोष्टी हसत खेळत अगदी रडत का होईना पण पचवण्याची सवय नकळत त्यांनीच लावली असा वाटत कधी कधी! सर्वांच्या डब्यात भाजी पोळी असली पाहिजे ह्या बाबतीत त्या ठाम असायच्या. वेळ आली तर पालकांना पण ठनकाऊन सांगायच्या..."वदनि कवल घेता", " राष्ट्रगीत" तसेच प्रार्थना कींवा वर्गशिक्षिक आले नसतील तर दुसऱ्या वर्गात जाताना तेच काय अगदी "शु" करायला जाताना पण  एका रांगेत जाणे हे सर्व त्यांच्या देखरेखे खाली चालयच. शाळेत असा एक पण विद्यार्थी नसेल जो त्यांना घाबरत नव्हता!

काल त्या दिसल्यावर  बोलायच्या आधी पटकन कानाला लावलेले ear phone काढले अन खिशात घातले. अजुन पण कदाचित मनात तो दरारा कायम आहे !

काही लोक आपल्याला नकळत खुप काही चांगल्या गोष्टी देऊन जातात, आपल्याकडून कसलीही अपेक्षा न करता !! माझ्या मित्रांपैकी काही लोक आता पालक झाले आहेत, त्यांना पुढे गुरव बाईंची आठवण  आल्याशिवाय राहनार नाही हे नक्की !!
लोक जीवनात सफलता फक्त पैशाने मोजत असले तरी माझ्या सारख्या हज़ारो विद्यार्थ्यांना शिस्तिचे धडे देणाऱ्या "गुरव बाईं " सारखे लोक पण जीवनात यशस्वीच आहेत!!
😊😊😊😊😊

_____✒️
May 2, 2017

सांगा कसं जगायचं

आयुष्यात काही गोष्टी आपल्याला जबरदस्त नुकसान देऊन जातात. त्यासाठी तुम्ही जबाबदार आहात की नाही हा विचार करण्याचा वेळपण नसतो आपल्याकडे, एकदम वादळ येते आणि आपण बांधलेले 'स्वप्नांचे' घर क्षणात मातीत मिळून जाते. स्वप्न मोडल्याचे दुःख नसते खर तर, पण पुन्हा स्वप्न बघायची ताकद आणि विश्वास ह्या गोष्टी परत कुठून आणायच्या?
झालेल्या घटनांसाठी स्वतः ला जबाबदार धरायचे झाले आणि  'जशास तसे' असा पकड़ल तर ह्या गोष्टी आपल्या बरोबर होतील आजवर इतका वाईट कोणाचा केल्या सारखा आठवत नाही. शेवटी काय चांगला-वाईट असा मुळात काही असतो असा वाटत नाही.
आणि मग अचानक लक्षात येत, ह्या सर्व कोलहालात आपल अस्तित्वच पूसुन गेलय.. इतक सर्व बदलत असताना फार गृहीत धरून घेतल सगळेच..
आणि अचानक निवांत बसलेला असताना जाणवतो कळणं आणि कळून घेण् ह्यातला फरक !!
काही गोष्टी कळून पण कळून घेतल्या नाहित तर कधी तरी कळून घ्याव्याच लागतात.. हेच जगण असत!
अश्या वेळेस जगायच कस हा प्रश्न उरतो..
थोड्या फार फरकाने सर्वांच जगण हे असच असत..

पाडगावकरांची एक सुंदर कविता आठवते...

कळ्याकुट्ट कळोखात
जेव्हा काही दिसत नसतं
तुमच्या साठी कोणीतरी
दीवा घेऊन उभं असतं
कळोखात कुढायचं की प्रकाशात उडायचं
तुम्हीचं ठरवा!

पेला अर्धा सरला आहे
असं सुद्धा म्हणता येतं
पेला अर्धा भरला आहे
असं सुद्धा म्हणता येतं
सरला आहे म्हणायचं की भरला आहे म्हणायचं
तुम्हीचं ठरवा!

शाप देत बसायचं की दुवा देत हसायचं
तुम्हीचं ठरवा!

सांगा कस जगायचं?
कण्ह्त कण्ह्त की गाणं म्हणत
तुम्हीचं ठरवा!