शिस्त हा जीवनामधला अविभाज्य घटक आहे. एक सेकंदने लोकल जाणाऱ्या किव्हा भेटणाऱ्या लोकांना त्याचे महत्व आज चांगलेच समजत असेल!
आज जरी आपल्याला हे वाटत असल तरी लहान असताना आपल्याला शिस्त नको वाटायची!" छड़ी लागे छम छम.. विद्या येई घम घम" अशी ती वेळ होती !!🤣
काल अचानक त्यांना समोर बघून पाय थांबलेच. मी कदाचित तीन- साडेतीन वर्षाचा असताना म्हणजेच शाळेत जायला सुरु केल्यापासून त्यांची ओळख झाली असेल.
शिपाई असल्या तरी मुख्यध्यापकां पेक्षा जास्त दरारा असायचा त्यांचा!! चोवीस- पंचवीस वर्षांनंतर पण अजुन तशाच !! तो ताठरपना, तोच पेहराव, तोच कड़क आणि धड़की भरावणारा आवाज़ !!! अर्थात त्यांनी नावाने ओळखला नसेल मला पण मी थांबलो आणि त्यांची विचारपुस केली. " कशा आहात? , कसा चालू आहे सर्व?" आणि अजुन काही औपचारिक गप्पा झाल्या.
आमच्या शिशुमंदीरच्या "गुरव बाई"!!
शाळेत असताना आम्ही ज्यांना सर्वात जास्त घाबरत होतो!!! त्यांच्या नावाची धमकी आमच्या सर्व शिक्षकांपासून घरी आई पण द्यायची! साधारणतः लहान मूल 3 ते 8 वर्षाच असताना त्यांच्या अंगात मूल्यशिक्षण रुजवायच काम हे चांगल्या प्रकारे होत असत. त्याच वेळेत गुरव बाईं सारखे शिस्त प्रेमी लोक मिळणे म्हणजे स्वतःला भाग्यवान मानणे अतिशयोक्ति होणार नाही !डब्यात आवडती भाजी असो नसो पण बाईंच्या भीतीने मधल्यासुट्टीत सर्व डबा संपवायला लागायचा. आपल्या जीवनात नआवडत्या गोष्टी हसत खेळत अगदी रडत का होईना पण पचवण्याची सवय नकळत त्यांनीच लावली असा वाटत कधी कधी! सर्वांच्या डब्यात भाजी पोळी असली पाहिजे ह्या बाबतीत त्या ठाम असायच्या. वेळ आली तर पालकांना पण ठनकाऊन सांगायच्या..."वदनि कवल घेता", " राष्ट्रगीत" तसेच प्रार्थना कींवा वर्गशिक्षिक आले नसतील तर दुसऱ्या वर्गात जाताना तेच काय अगदी "शु" करायला जाताना पण एका रांगेत जाणे हे सर्व त्यांच्या देखरेखे खाली चालयच. शाळेत असा एक पण विद्यार्थी नसेल जो त्यांना घाबरत नव्हता!
काल त्या दिसल्यावर बोलायच्या आधी पटकन कानाला लावलेले ear phone काढले अन खिशात घातले. अजुन पण कदाचित मनात तो दरारा कायम आहे !
काही लोक आपल्याला नकळत खुप काही चांगल्या गोष्टी देऊन जातात, आपल्याकडून कसलीही अपेक्षा न करता !! माझ्या मित्रांपैकी काही लोक आता पालक झाले आहेत, त्यांना पुढे गुरव बाईंची आठवण आल्याशिवाय राहनार नाही हे नक्की !!
लोक जीवनात सफलता फक्त पैशाने मोजत असले तरी माझ्या सारख्या हज़ारो विद्यार्थ्यांना शिस्तिचे धडे देणाऱ्या "गुरव बाईं " सारखे लोक पण जीवनात यशस्वीच आहेत!!
😊😊😊😊😊
_____✒️
May 2, 2017
No comments:
Post a Comment