Thursday, June 7, 2018

मन..

मन..!! कधी कधी एखाद्या ऐतिहासिक किल्या प्रमाणे मनाची अवस्था झालेली असते. आपण आपल्याच मनात जातो एका चोर वाटेने! हे मन इतकं अवाढव्य आहे की आत शिरायचं ठरवलं की प्रत्येक प्रवासात एक वेगळी चोर वाट सापडते. त्या चोरवाटेने जाताना अचानक एक नवं दालन उघडतं !! त्यात एक वेगळा खजिना स्वागता साठी सज्ज असतो. त्या दालना जवळ थांबलो की नव्याने शोध लागतो "अरे .. आपल्याला ह्याही विषयात गोडी आहे.." मग काही दिवस ते नवं दालन सोडवावा वाटत नाही . त्याचा आस्वाद घेत काही दिवस आपण तिथेच मुक्काम करतो . पण काही दिवसांनी त्या प्रवासात अजून एक चोरवाट सापडते !! मागच्या प्रवासातली दालनं ह्या प्रवासात लागत नाहीत . पुन्हा मुक्काम ...पुन्हा नवीन दालनं.. पुन्हा हरवणं ... अस किती तरी दिवस  चालत.. असच चालत राहत.. कुठे स्थिर व्हावं समजत नाही.. मनातल्या अवाढव्या किल्याला  अशी किती दालनं आहेत कळत नाहीत. प्रत्येक दालनं खुणावतं !!  आपल्याला इथंही गती आहे हे नव्याने जाणवतं. पण प्रत्येक चोर वाटेच्या बाहेर एक राक्षस आहेच. आपली प्रत्येक चोर वाट.. प्रत्येक दालनं.. समजून घेणारी माणसं प्रवासात आपल्याला भेटली तर सर्व काही ठीक असते.. नाहीतर इतिहासात  वाचतो तसा किल्ल्यांवर फक्त हल्ले होत राहतात.. त्यांच्या सौदर्याची फक्त नासधूस होत राहते..

No comments:

Post a Comment