Thursday, June 14, 2018

आठवणीतले दिवस..

रविवार चा दिवस , working असल्यामुळे सुरवात थोडी कंटाळवाणीच झाली. पण आज पुन्हा शाळेत जायला भेटणार म्हणून थोडी excitement होती. सेवा सहयोग तर्फे कर्जत च्या वेगवेगळ्या ग्रामीण भागात school kit वाटप चा कार्यक्रम हे निमित्त होते. अभिनव ज्ञान मंदिर ही माझी शाळा. सेवा सहयोग च्या माध्यमातून आज शाळेचा चेहरा खूप बदलून गेलाय! क्रीडा विकास कार्यक्रम शाळेत खूप जोमाने राबवला जात आहे. बास्केट बॉल ग्राउंड पासून ते गोळा फेक थाळी फेक चे सर्व साहित्य शाळेला सेवा सहयोग् ने पुरवले आहे. एक माजी विद्यार्थी म्हणून प्रथम त्याचे खूप खूप आभार.  त्या दिवशी शाळेत जाणे झाल्यामुळे शाळेतल्या खूप आठवणी ताज्या झाल्या. शाळेतल्या चौकातले राष्ट्रगीत पासून ते सर्व प्रार्थना झाल्यानंतर  केस वाढले असतील तर झिंज्या पकडून बर्वे सर आणि बडे सर ह्यांनी दिलेले पाठीतले फटके पण आठवले. काय शिस्तीतले दिवस होते ते !!  केस किती वाढवायचे हे पण शिक्षक ठरवत होते. खऱ्या अर्थाने शिक्षकाचे महत्व त्यांना दिले जायचे. त्यात अगदी एखादा राजकरण्याचा मुला पासून ते लहान सहान पर्यंत सर्व यायचे. आजकाल तर शाळेत जायला सुरवात नाही तर फुटबॉल कट चा हट्ट असतो मुलांचा!! असो.. आता genration पुढे गेलीये म्हणून असेल कदाचित ! आठवणी ताज्या होत असताना मुद्दाम मी आमच्या त्या वेळेस असणाऱ्या काही वर्गांत एक चक्कर मारली. 'ड' पासून 'फ' पर्यंत सर्व तुकड्या आठवल्या. ते सर्व मित्र आठवले, डोळ्या समोर अगदी स्पष्ट चित्र येत होते. सध्या पावसाळा चे दिवस म्हणजे ह्या दिवसात शाळा सुरु व्हायची, सुट्टीत क़ाय क़ाय केले ह्या गप्पा रंगायच्या , त्या नवीन वह्यांचा वास, कोणी आधीच्या वर्गातील असतील तर आधीच त्यांचे पुस्तके अर्ध्या किमतीत घेऊन यायचे. त्यात एखादे वेगळे पुस्तक असेल तर मुद्दाम एकदा शाळेत घेऊन येऊन सर्वांसमोर मिरवायचे. मधल्या सुट्टीत प्रत्येकाच्या डब्यात काय आणले हे जाणून घ्यायची उत्सुकता, मध्येच एकमेकांच्या बापाचा उद्धार करणे, एखाद्याला नाहक त्रास देऊन खूप चिडून देने हे सर्व चालायचे. त्यात जर कोणी मुलीशी बोलताना दिसलाच तर त्याची खैर नसायची अगदी त्याला काही दिवस त्या मुलीच्या नावानेच हाक द्यायची. स्नेहसंमेलन म्हणजे वर्षातले खूप सुगीचे दिवस, त्यात ते चार गट, नेताजी, शिवाजी,रानाप्रताप आणि लाल बहाददूर. ह्यात आपल्या गटाला प्रत्येक खेळात जीव ओतून सपोर्ट असायचं, खेळून सपोर्ट नाही करता आला तरी बाहेरून ओरडून ओरडून चिअर असायचं!! आजकल शाळेच्या बाहेर च वातावरण बघीतल तर हे कुठेच दिसत नाही. फक्त मोबाइल आणि सेल्फी इतकीच काय ते उठून दिसते. असो आता generation पुढे गेलीये म्हणून असेल कदाचित !! शिंदे सर त्या दिवशी काही कामा निमित्त शाळेत आले होते त्यांच्याशी भेट झाली, गप्पा झाल्या. बोलताना तिच आदरयुक्त भीती अजूनही मनात असते. त्या वेळेस सारखा शिक्षकांचा धाक आता राहिला नाही हे आताचे शिक्षक पण कबूल करतात, शाळेत पाच मिनिटे जरी उशीर झाला की बडे सर सर्व मैदानावरचा कचरा साफ करायला लावायचे, आम्हाला शाळेत पडलेले फटके घरी समजून द्यायचे नाही हा आमचा प्रयन्त असायचा कारण ते ऐकल्यावर घरातल्यांचे अजून फटके पडायचे, आता मात्र माझ्या मुलावर हात का उगारला ह्या विषयी पालकांची तक्रार असते. असो generation पुढे गेलीये म्हणून असेल कदाचित. आता ती तीन दिवसांची सहल जात नाही. सकाळी जाऊन संध्याकाळी परत अशीच सहल चालते, कारणं पण तशीच भयंकर आहेत. असो!
पण आज एकूणच सर्व आठवणी एकदम डोळ्यासमोर येऊन गेल्या. वर्गातल्या त्या बाकां पासून, तुटलेल्या बाकांच्या बॅट बनवून खेळलेले क्रिकेट, प्लास्टिक आणि नंतर स्पंज च्या बॉल ने खेळलेली आबदुबी पासून ते त्या  चित्र काढलेल्या भिंति पर्यन्त सर्व काही !!आजही खूप वर्षां नंतर काही जण कधी समोर येतात ; काही ओळखतात, काही ओळखत नाहीत, काही आपल्याला ओळखू येत नाहीत.काहीही असले तरी आठवणी मात्र सर्वांचा काही अंशी समान असतील.

No comments:

Post a Comment